विमान शेजारच्या बेटावर कोसळले; दहशतवादाशी संबंध नसल्याचा निर्वाळा
आत्मघाती असलेल्या विमान तंत्रज्ञाने येथील सी टॅक इंटरनॅशनल विमानतळावरून एक रिकामे होरायझन एअर टबरेप्रॉप विमान पळवले. त्याचा अमेरिकी लष्करी जेट विमानांनी पाठलाग केला असता ते विमान शुक्रवारी रात्री प्युगेट साउंड येथील एका लहान बेटावर कोसळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार २९ वर्षांच्या तंत्रज्ञाने हे विमान पळवले होते, त्याला विमान चालवण्याची कुठलीही कौशल्ये ज्ञात नव्हती. त्यामुळे कसरती करता करता ते विमान अखेर कोसळले, असे पिअर्स परगण्याच्या नगरपाल कार्यालयाने सांगितले.
या व्यक्तीमध्ये आत्मघाती प्रवृत्ती होती व त्याचा दहशतवादाशी काही संबंध नाही असे नगरपाल कार्यालयाचे प्रवक्ते एड ट्रोयर यांनी सांगितले. दृश्यफितीनुसार होरायझन एअर क्यू ४०० हे विमान सूर्यास्ताच्यावेळी मोठय़ा गिरक्या घेत होते. त्यात प्रवासी नव्हते. हे विमान दिसल्यानंतर लष्कराच्या विमानांनी त्याचा पाठलाग केला असता ते टाकोमाच्या नैर्ऋत्येला केट्रॉन बेटांवर कोसळले.
ट्रोयर यांच्या म्हणण्यानुसार एफ १५ विमान ओरेगॉन येथील पोर्टलँड येथून पाठलागासाठी बाहेर पडल्यानंतर काही काळ आकाशात होते. वैमानिकाने जमिनीवरील लोकांना सुरक्षित ठेवले. विमान चोरणाऱ्या पिअर्स परगण्याच्या रहिवाशाची चौकशी करण्यात येणार आहे, त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. परगण्याचे नगरपाल पॉल पास्टर यांनी सांगितले, की त्या व्यक्तीने मूर्खपणा केला व त्याचे काय झाले ते समजू शकले नाही. त्याने हवाई नियंत्रकांना सांगितले की, माझे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.त्याला विमान उतरवण्यासाठी समजावण्यात आले, धावपट्टी कुठे आहे हे सांगण्यात आले. पण मी जर विमान उतरवले तर तुम्ही मला पकडून न्याल व तुरूंगात टाकाल असे तो म्हणाला. नंतर त्याने अनेक लोक माझी काळजी करीत असतील पण त्यांच्यासाठी हे सगळे निराशाजनक आहे, असेही त्याने सांगितले.
सी टॅक येथून सुटणारी विमाने काही काळ थांबवण्यात आली. अमेरिकी तटरक्षक दलाने नंतर विमान कोसळले तिकडे ४५ फुटांचे जहाज पाठवले. टबरेकॉप हे ७६ आसनांचे विमान होते

No comments:
Post a Comment