कोल्हापूर/सातारा/पुणे- खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण, रुपेश सपकाळ, विकी यादव, दीपक धडवई, युवराज शिंदे, सनी भोसले, विवेक जाधव, अमोल हदगे, अमर आवळे, सुजित आवळे, सनराज साबळे यांना सुरुची धुमश्चक्रीप्रकरणी हायकोर्टाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मुंबई हायकोर्टात सोमवारी (दि. 22) खासदार समर्थकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खासदार भोसले समर्थकांच्यावतीने अशोक मुंदरगी व शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले.

No comments:
Post a Comment